पुन्हा एकदा आम्हीच जिंकू : देवेंद्र फडणवीसांचा दावा !

सध्या जगभरासहित भारतात कोरोना महामारीचे संकट भेडसावत आहे . अशा परिस्थितीमध्ये गर्दी टाळणे किती महत्वपूर्ण आहे याची कल्पना आपल्या सर्वांनाच आहे. मात्र अशावेळीही बिहार हे राज्य निवडणुकीला सामोरे जाणार आहे . कोरोनाकाळात निवडणूक लढवणारे बिहार हे पहिले राज्य ठरले आहे .अशातच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे की बिहार मध्ये भाजपच निवडणूक जिंकेल .
फडणवीस म्हणाले की बिहारच्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे त्यामुळे करोना काळ असला तरीही भाजप बिहार निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेवर येऊ .एवढंच नाही तर,भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकांची जबाबदारी देखील फडणवीसांना दिली आहे , त्यामुळे ते बिहारमध्ये आहेत .
दरम्यान बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे, ज्याची सुरुवात २८ ऑक्टोबरपासून होत आहे . तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे .पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांनी आम्हीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला.