पुन्हा अहमदनगर जिल्ह्यात वर्दी कलंकित

0 51

अहमदनगर-  शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक आणि सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी विकास
वाघ याच्याविरोधात अखेर तरुणीचा छळ करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विकास वाघ सध्या सुट्टी वर आहेत.

२०१९ मध्ये तक्रार देण्याच्या निमित्ताने कोतवाली पोलीस ठाण्यात आलेल्या २६ वर्षीय तरुणीशी विकास वाघ याने ओळख वाढविली आणि काही दिवसानंतर वाघ हा पीडित तरुणीच्या घरी गेला.ही माझी मुलगी आहे असे सांगत ओळख वाढवली नंतर घरी जाऊन तेथे तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वाघ याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

यावेळी तरुणीने प्रतिकार केला तेव्हा वाघ याने तिला कंबरपट्ट्याने जबर मारहाण केली. तसेच ‘ही बाब कुणाला सांगितली तर तुझे कुटुंब संपवून टाकील’ अशी धमकी दिली. त्यानंतर विकास वाघ याने पीडितेवर वेळोवेळी कधी हॉटेल तर कधी कोतवाली पोलीस निरीक्षकाच्या निस्थानी अत्याचार केला. पीडित तरुणी गरोदर राहिल्याची बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने २६ सप्टेंबर २०१९ रोजी तिला तो राहत असलेल्या बंगल्यावर नेऊन मारहाण करत जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. आणि गर्भपात केलाय असा आरोप पीडित महिलेने केलाय.

या त्रासाला कंटाळून पीडितेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. ही बाब विकास वाघ याला समजल्यानंतर त्याने पीडितेला एमआयडीसी परिसरात नेऊन धमकी दिली तसेच तिच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षया घेतल्या आहेत. त्यानंतर ११ सप्टेंबर २०२० रोजी वाघ याने पीडितेला जबरदस्तीने नगर तालुक्यातील मिरावली पाडावर नेऊन तेथेही तिच्यावर अत्याचार करीत जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात त्या तरुणीच्या फिर्यादीवरून विकास वाघ याच्याविरोधात बलात्कार, मारहाण, जबरदस्तीने गर्भपात आदी कलमांतर्गत गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.

Related Posts
1 of 1,359

ज्या ठाण्यात निरीक्षक आहे तेथेच दाखल झाला गुन्हा

विकास वाघ कोतवाली पोलीस ठाण्यात निरीक्षक असताना विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. त्याचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि नगर येथील नाजूक प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरले होते. अखेर ज्या पोलिस ठाण्यात तो निरीक्षक होता त्याच पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: