DNA मराठी

पुढील २४ तास धोक्याचे : मुंबईत जोरदार पावसाची शक्यता !

0 74

मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागांना झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी शिरले आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे .मुंबईत रस्ते , घर , दुकाने रेल्वे स्टेशन अशा सर्वच ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे.इथून पुढचे २४ तास देखील मुंबईकरांसाठी धोक्याचे आहेत . हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस कोसळू शकतो .

कोरोनामहामारीमुळे सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा सुरू आहे.मात्र मुसळधार पावसामुळे ही सेवा देखील ठप्प झाली आहे . एकीकडे कोरोनाचे महासंकट तर दुसरीकडे पावसाचा कहर त्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Related Posts
1 of 2,489

कालच्या पावसाचा परिणाम म्हणून आज मुंबईमधील सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच गरज नसल्यास घराबाहेर न पाडण्याचे आव्हान महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: