पार्थच्या ‘जय श्रीराम’नंतर आता रोहित पवारही म्हणाले ‘असं’


अहमदनगर – मंदिरे आणि धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरू व्हावीत असे माझेही म्हणणे आहे. त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. मंदिरे आणि धार्मिकस्थळं सुरू करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी केली आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असे रोहित यांनी ट्विट केले आहे. पर्युषण काळात जैन मंदिरे उघडण्यास परवानगी देता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच स्पष्टपणे म्हटले पार्थ पवार यांनी जय श्रीराम केल्यानंतर आता रोहित पवारांनी मंदिर उघडण्याची मागणी केल्याने राष्ट्रवादी सॉफ्ट हिंदुत्व तर अंगीकारात नाही ना ? असा सवाल उपस्थित होत आहे. रोहित पवार यांनी मंदिरे उघडण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.