पारनेर तालुक्यात अनैसर्गीक कृत्ये करणा त्या नराधमास अटक

अहमदनगर -पारनेर तालुक्यातील पळशी येथे महिलेवर
अनैसर्गिक कृत्य करून बलात्कार केल्या प्रकरणी , पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.
निराधार महिलेस तुला आणि तुझ्या मुलीचा सांभाळ करून तिचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर गेली तिन वर्षे अनैसर्गिक कृत्य करत बलात्कार करणाऱ्या आरोपीला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी पिडीते महिलेने पारनेर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव आग्रेवाडी, येथे रहाणाऱ्या रावसाहेब विनायक विधाटे याने २०१७ पासून पीडित महिलेस मुलीच्या लग्नाच्या, तिला सांभाळण्याच्या बहाण्याने फिर्यादी पिडीतेस तिच्या संमतीशिवाय वेळोवेळी शारीरीक सबंध ठेउन अनैसर्गिक करत बलात्कार करायचा.
कृत्येही करण्यास भाग पाडायचा. त्यास विरोध केल्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण करायचा. फिर्यादीच्या मुलीने दवाखान्यातील उपचारासाठी पैशांची मागणी केली असता आरोपीने शिविगाळ करून तुझा आणि माझा काही सबंध नाही तू तुझ्या घरी निघून जा आणि माझ्या विरोधात कुठे तक्रार केली तर तुला आणि तूझ्या आईलला मी जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. पिडीतीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रावसाहेब विधाटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा बलात्कार, दरोडे घर फोड्या, खून या घटनांना मध्ये वाढ होत आहे, तीन मंत्र्यांच्या जिल्हात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय.