DNA मराठी

पाथर्डी नगरपरिषदे मार्फत या कामात मोठ्या प्रमाणवर आर्थिक गैरव्यवहार…… 

0 184

पाथर्डी – नगरपरिषदे मार्फत शेवगाव रोडलगत सांडपाणी वाहत असलेला ओढा बुजवून ४ कोटी रुपये खर्चून जॉगिंग ट्रक बांधण्यात येत आहे. या कामासाठी आता पर्यंत जवळपास शासनाचा ३.५ कोटी रुपये निधी खर्च झालेला आहे. परंतु पाथर्डी शहरालगतच्या वनदेव डोंगरापासून शहरातील गटारींचे सांडपाणी,मैला मिश्रित पाणी याठीकांच्या ओढ्यातून वाहत जावून पूर्वेकडील नदीला मिळत असल्याने या ओढ्याच्या परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते. 


नियमांची पायमल्ली करून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असलेला ओढा बुजवण्यात आला असून ओढ्याचे रुपांतरण अरुंद गटारीत करून पालिका पदाधिकारी व तत्कालीन मुख्याधिकारी व अभियंते यांनी या कामात मोठ्या प्रमाणवर आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा तसेच याबाबत तक्रारी करूनही राजकीय दबावामुळे चौकशी होत नसल्याचा आरोप किसन आव्हाड यांनी केला आहे. 

Related Posts
1 of 2,492


नुकतीच अतिवृष्टी झाल्याने या पार्कमध्ये सांडपाणी पाणी घुसल्याने पार्क जलमय झाला आहे.जॉगिंग पार्क निकृस्थ व नियमबाह्य कामाची गुणवत्ता तपासण्यात येवून गैरव्यवहार करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी केली आहे.अश्यातच लोकभावनेचा आदर न करता शासनाचे व मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दुर्लक्षित करून चुकीच्या ठिकाणी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बसवन्याचे काम पालिका प्रशासना कडून सुरु आहे.निर्जन ओढ्या शेजारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा न बसवता तो पुतळा शहरामधील मुख्य चौकामध्ये  बसवण्याची मागणी देखील किसन आव्हाड यांनी केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: