पाकिस्तानच्या कारागृहात भारताचे ३१९ नागरिक

0 29

नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागच्या २ दिवसापूर्वी कैद्यांच्या यादीचे आदानप्रदान करण्यात आला आहे.

पाकिस्तानात भारताचे सध्या ३१९ कैदी असून त्यामध्ये ४९ नागरी कैदी आहे तर २७० मच्छीमार आहेत. या सर्वांची यादी भारतीय उच्चायुक्तालयास देण्यात आली आहे.

तर दुसऱ्याकडे भारतानेही सुद्धा ३४० पाकिस्तानी कैद्यांची यादी पाकिस्तान उच्चायुक्तालयास दिली असून त्यात २६३ नागरिक तर ७७ मच्छीमार आहेत. अशी माहिती परराष्ट्र कार्यालयाने दिली आहे.

Related Posts
1 of 1,301

या बाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे, की भारत आणि पाकिस्तान दरम्यान २१ मे २००८ रोजी जो करार करण्यात आला होता त्यानुसार ही यादी देण्यात आली आहे. राजनैतिक संपर्क करारानुसार या याद्यांचे आदान प्रदान केले जाते.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: