पहिल्या दिवशी संसदेत ३० खासदार पॉझिटिव्ह

नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशन हे १४ सप्टेंबर पासून सुरु झाला मात्र या अधिवेशण्याचा पहिल्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभे मधील खासदारा पैकी ३० खासदारची कोरोना चाचणी हे सकारात्मक आली आहे. या मध्ये १७ लोकसभा खासदार आहे.
या मध्ये सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी यांचे सर्वात जास्त खासदाराची कोरोना चाचणी हे सकारात्मक आली आहे,त्यांचे १२ लोकसभा खासदारा हे पॉझिटिव्ह आले आहे. भारतीय जनता पार्टीचे दिल्लीचे खासदार परवेश वर्मा आणि मीनाक्षी लेखी यांचा सुध्दा या बारा खासदारा मध्ये समावेश आहे. तर उर्वरित खासदारपैकी १ शिवसेना १ आरएलपी चे खासदार आहे. वायएसआर कॉंग्रेसचे दोन खासदाराची कोरोना चाचणी सुध्दा सकारात्मक आली आहे. ही कोरोना चाचणी १३ आणि १४ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती.
सुत्रानुसार संपूर्ण संसद भवनात एकूण ५६ जणांनी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे त्यात खासदार, लोकसभा आणि राज्यसभा सचिवालय आणि मीडियाप्रेसर यांचा समावेश आहे. एकच दिवसात ५६ जणांची कोरोना चाचणी सकारत्मक आल्याने संसदेत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. हे आधिवेशन १ ऑक्टोबर पर्यंत’चालणार आहे . या अधिवेशनात प्रत्येक खासदारांच्या आसनासमोर काचेचा पडदा लावण्यात आला आहे या मुळे सर्व खासदारला बसूनच बोलावा लागत आहे.