DNA मराठी

पबजी पुन्हा भारतात परतण्याची शक्यता

0 173

पबजी पुन्हा भारतात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत सरकारने पबजीसह ११८ चिनी अ‍ॅप्सवर काही दिवसा पूर्वही  बंदी घातली होती. काही दिवसांनंतर पबजी कॉर्पोरेशन ने चीनच्या ‘टेन्सेन्ट गेम्स’ला पबजी मोबाइल गेमची भारतातील फ्रँचाइझी न देण्याचा निर्णय घेतल्यची बातमी समोर येत आहे.  पबजी गेम मुख्य दक्षिण कोरियाच्या पबजी कॉर्पोरेशन ने डेव्हलप केला आहे. पण, भारत आणि चीनमध्ये चीनची कंपनी टेन्सेंट गेम्स ‘पबजी मोबाइल’ आणि ‘पबजी मोबाइल लाइट’ या दोन गेम्सचे ऑपरेशन्स बघते. पण, भारताने बंदी घातल्यानंतर आता  पबजी कॉर्पोरेशन ने टेन्सेंट गेम्सकडून भारतातील हक्क काढून घेतले आहेत अशी बातमी आहे .  

Related Posts
1 of 2,489

टेन्सेंट गेम्सकडे आता भारतातील पबजी मोबाइल गेम हाताळण्याची जबाबदारी नसेल, गेमची सर्व जबाबदारी आता पबजी कॉर्पोरेशन कडेच असेल अशी घोषणा दक्षिण कोरियाच्या कंपनीने केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही पूर्ण आदर ठेवतो, खेळाडूंच्या डेटा सुरक्षेला कंपनीचं सर्वोच्च प्राधान्य आहे. भारतीय कायद्यांचे आणि नियमांचे पूर्णपणे पालन करत गेमर्सना पुन्हा एकदा हा गेम खेळता यावा यासाठी भारत सरकारबरोबर चर्चा करुन उपाय काढण्याची अपेक्षा आहे असं कंपनीने म्हटलं आहे.

यामुळे भारतातील पबजीवरील बंदी लवकरच हटवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत पबजी मोबाइल आणि पबजी  मोबाइल लाईट यांचा उल्लेख आहे. म्हणजे केंद्र सरकारने दक्षिण कोरियाच्या नाही तर चिनी कंपनीचा संबंध असणाऱ्या पबजी मोबाइल आणि पबजी  मोबाइल लाईट  यांच्यावर बंदी आणली आहे. पण, मूळ पबजी गेम जो कम्प्युटरवर खेळला जातो, तो दक्षिण कोरियाचा असून अजूनही भारतात तो सुरूच आहे. टेन्सेंटकडून भारतातील फ्रेंचाइझी काढून घेतल्यानंतर ‘पबजी मोबाइल गेम’चा संबंध चीनशी राहणार नाही.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: