पबजी आता पण खेळता येणार    

0 162

मुंबई – भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे परत एखादा भारताकडून चीनला एक झटका देण्यात आला आहे. सरकारने तब्बल ११८ चिनी अ‍ॅपवापरण्यावर बंदी घालली आहे. त्यात देशात सर्वाधिक डाऊनलोड झालेल्या पबजी मोबाईल अँपचासुध्दा समावेश आहे. यामुळे अनेक तरुण-तरुणी पबजी युझर्स नाराज झाले आहेत. परंतु चिंता करण्याची गरज नाही. कारण अजून एका मार्गाने तुम्ही तुमचा आवडणारा पबजी गेम तुम्ही खेळू शकता.

Related Posts
1 of 2,047

पबजी मोबाईल गेम दक्षिण कोरियन कंपनी ब्लूहोल ने तयार केला आहे.परंतु तरीही पबजी या गेममध्ये काही चीननी कंपनीचे फिचर आहे. त्यामुळे डेटा लिक होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. या एकमेव कारणामुळे पबजी गेमवर भारतात बंदी घालण्यात आली.पबजी डेस्कटॉप याच्या माध्यमातून तुम्ही आताही पबजी गेम खेळू शकणार आहे.

कारण देशभरात या गेमवर अद्याप बंदी घातलेली नाही.पबजी डेस्कटॉप या फिचरचे राईट्सदेखील दक्षिण कोरियन कंपनी ‘ब्लूहोल’ यांच्याकडेच आहेत. मात्र यात कोणत्याही चिनी कंपनीची भागीदारी नाही. त्यामुळे या फिचरवर भारतात आतापर्यंत बंदी घातलेली नाही.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: