पत्रकारांसाठी कोव्हिडं सेंटर मध्ये स्वतंत्र बेड ची व्यवस्था करावी अकोला तालुका पत्रकार संघाची मागणी

0 37

अकोला – पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबियांना कोव्हिडं सेंटर मध्ये दोन बेड ची व्यवस्था करावी अशी मागणी अकोला तालुका पत्रकार संघाने केली आहे.

अकोला तालुक्यात कोरोनाच्या लढाईत अकोला तालुक्यातील पत्रकार प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत या लढाईत कुठल्याही प्रकारे जीवाची पर्वा न करता एक पाऊल पुढे आहे.कोरोना संदर्भातील शासनाचे सर्व शासकीय आदेश वर्तमानपत्र आणि TV चॅनलच्या माध्यमातुन समाजापर्यंत पोहोचविणे,कोरोना संसर्ग टाळण्यासाठीचे उपाययोजनांची माहीती समाजाच्या गळी उतरविण्यासाठी वारंवार समाजजागृतीची भूमिका घेऊन वेळ प्रसंगी वृत्तांकनासाठी जीव धोक्यात घालून ढाल बनून सर्वात पुढे असणारा पत्रकार सुद्धा शेवटी माणूसच आहे,त्यालाही परिवार आहे.

आजच्या या कोरोनाच्या संकटात प्रशासनाला एकच विनंती आहे की,जर एखादा पत्रकार मित्र कोरोना पॉझिटीव्ह आला तर त्यांचासह त्यांच्या परिवारासाठी अकोला शहरात नव्याने होऊ घालेल्या डॉ.भांडकोळी कोव्हिडं हॉस्पिटल मध्ये सर्व सर्वसोयीनयुक्त स्वतंत्र दोन बेडची व्यवस्था करावी अशी मागणी निवेदना मध्ये करण्यात आली आहे.

Related Posts
1 of 1,359

या वेळी अकोला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास तुपे, सचिव सुभाष खरबस विश्वस्त प्रा.बाळासाहेब मेहेत्रे, श्रीनिवास रेणुकादास ,गोकुळजी कानकाटे, नंदकुमार मंडलिक. उपाध्यक्ष सचिन खरात, विनय समुद्र, राजेंद्र जाधव, सुनील गीते, विनायक घाटकर आदी उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: