पठारवाडीतील खडी क्रशरला साडेचार कोटींचा दंड…

0 29

पारनेर – तालुक्यातील पठारवाडीतील दोन खडी क्रशरला सुमारे साडेचार कोटींचा दंड पारनेर तहसिलदारांनी केला आहे. येथील खडी क्रशर अनाधिकृत असल्याच्या अनेक तक्रारी महसुल विभागाला यापुर्वी स्थानिकांनी केलेल्या होत्या. येथील क्रशरमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.क्रशरच्या स्फोटांमुळे कुकडी कालवा फुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या विषयी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली होती . या बाबत हरित लवादाने दंड आकारणीसाठी उच्च स्थरीय समीती स्थापन करण्यात आलीआहे, परंतु हरित लवादाच्या आदेशाचे अद्याप पालन करण्यात आलेले नाही.

Related Posts
1 of 1,301

पारनेर महसुल प्रशासनाने केलेला दंड हा गेल्या एप्रील ते ऑक्टोबर २०२० पर्यतचा विजेचा वापर व भरणा केलेले स्वामीत्वधन यातील तफावत यावरून आकारण्यात आलेले आहे. पठारवाडी येथील गट १०२९ चे मालक दत्तात्रय बाबूराव लाळगे यांना २ कोटी ११ लक्ष तर सुनिल रघूनाथ पवार यांना २ कोटी २८ लक्ष रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सदरचा दंड तातडीने जमा करण्याचे आदेश तहसिलदार ज्योती देवरे यांनी संबंधीतांना
बजावला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: