पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग येणार आमने-सामने !

0 39

सध्या भारत आणि चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे.सीमाप्रश्न शांततेत सुटावा यासाठी लष्करी आणि मंत्रिस्तरावर चर्चा सुरु आहे.असे असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आमने सामने येणार आहेत.एका परिषदेत ते दोघे समोर येणार आहेत. भारत -चीन दोन्ही देशांदरम्यानचा तणाव वाढल्यानंतर पहिल्यांदाच हे नेते समोर येणार असल्याने याकडे सर्व जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान 17 नोव्हेंबरला BRICS राष्ट्रांची बैठक होणार आहे त्यात सर्व देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे होणार आहे. भारत, ब्राझील, रशिया, चीन , दक्षिण आफ्रिका हे देश या संघटनेचे सदस्य आहेत.

Related Posts
1 of 253

भारत चीन या दोन देशांमध्ये तणाव असताना चीनने पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याची माहिती आहे.मात्र भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘राफेल’ या अत्याधुनिक विमानांचा समावेश झाल्याने आता भारताची स्थिती अधिक मजबूत झाली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: