पंतप्रधान मोदींनी सर्वांना मागितलं ‘हे’ बर्थ डे गिफ्ट, जाणून घ्या …

0 61

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर रोजी आपला ७० वा वाढदिवस साजरा केला. जगभरातून कित्येक दिग्गजांनी आणि भारतीयांनी सोशल मीडियावर मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इतकंच काय तर सोशल मीडियावर मोदींच्या वाढदिवसानिमित्त ट्रेंड सुरु होता. अनेक चाहत्यांनी मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्या देत गिफ्ट काय द्यायचं हा प्रश्न विचारला.यावर पंतप्रधान मोदींनीदेखील काय गिफ्ट हवं आहे याची लिस्ट सांगितली आहे. जाणून घेऊया मोदींना काय गिफ्ट हवं आहे आपल्याकडून…

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत वाढदिवसाचं गिफ्ट मागितलं आहे. त्यांनी ट्विट केले आहे – अनेकांनी मला वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट हवं याबद्दल विचारलं होत . सर्वांनी व्यवस्थित मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा . ‘दो गज की दूरी’ या नियमाचे पालन करा.गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.स्वत:ची इम्युनिटी वाढवा आणि जग स्वस्थ-निरोगी बनवूया’ असं ट्विट करून मोदींनी बिर्थ डे गिफ्ट आपल्या सर्वांना मागितले आहे.

Related Posts
1 of 546

तसेच मोदींनी सर्वांचे आभारदेखील मानले आहेत .त्यांनी म्हटले आहे – तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे मला जनतेची सेवा करण्याची आणि जनतेचं जीवनमान सुधारण्याच्या काम करण्याची शक्ती मिळत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: