
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतामध्ये जितके लोकप्रिय आहेत तेवढेच जगभरातदेखील आहेत. अमेरिकेतील प्रसिद्ध मॅगजिन टाइमने जगातील 100 प्रभावी व्यक्तिमत्वांची सूची जारी केली आहे.त्या सूचीमध्ये मोदींचे नाव आहे , त्यामुळे जगभरात मोदींच्या नावाचा डंका आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही . मोदींप्रमाणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही या यादीमध्ये समावेश आहेत. तसेच अजून काही भारतीयांनी देखील लोकप्रियतेच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे .
अभिनेता आयुष्मान खुराना,गूगलचे सीईओ सुंदर पिचाई,रविंदर गुप्ता आणि शाहीन बाग आंदोलनातील सहभागी बिल्किस यांनीदेखील या यादीमध्ये स्थान पटकावले आहे .लोकप्रियता पाहता जगभरातून मोदींचे कौतुक होत आहे.
पीएम टाइम मॅगजिनने म्हटले आहे की – भारताचे नाव गेल्या 7 दशकांपासून जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देशांच्या यादीत आहे. भारतात विविध धर्मांच्या लोकांचा समावेश आहे.
टाइम मॅगजिनने मोदींबद्दल म्हटले आहे की- मोदींच्या नीतींमुळे तमाम भारतीयांनी गरीबीतून बाहेर आले आहेत. ही प्रगती कोणत्याही आधीच्या तुलनेत अधिक जलद गतीने झाली आहे .