DNA मराठी

पंतप्रधानचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगारी दिवस म्हणून साजरा करा- विरोधकांचा नागरिकांना आव्हान  

0 212
modi

नवी दिल्ली – येत्या १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीं हे आपला आयुष्यातील ७० वर्ष पूर्ण करणार आहे. नरेंद मोदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजपाने तयारी सुरु केली आहे. या वर्षी मोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी ‘सेवा सप्ताह’ची घोषणा केली. यंदा मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्नवाटपाबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि औषध वाटप करण्याची तयारी भाजपाने केली आहे. तसेच रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

Related Posts
1 of 2,492

७० ठीकाणी ७० कार्यक्रम भाजपा करणार आहे . मात्र एकीकडे भाजपाने सेवा सप्ताहची घोषणा केलेली असतानाच दुसरीकडे भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. तर भाजपाच्या ‘सेवा सप्ताह’ला आवाहन म्हणून हा आठवडा ‘बेरोजगारी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचंही आवाहन विरोधकांनी जनतेशी केला आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उत्तरेतील राजकारण  आता चांगलाच तापलेला दिसत आहे.

मागील वर्षी पंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस पक्षाच्या माध्यमातून एक आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत साजरा करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर यंदा मोदींचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा भाजपाने ठरवला आहे. हीच गोष्ट लक्षात घेत बिहारमधील सुलेह देव समाज पार्टीचे प्रमुख पियुष मिश्रा यांनी ट्विटरवरुन हा आठवडा ‘बेरोजगारी सप्ताह’ म्हणून साजरा करावा असं आवाहन केला आहे. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: