नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण राज्य अनलॉक  होईल – राजेश टोपे 

0 40

अहमदनगर:  राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण राज्य अनलॉक  होईल, अशी अपेक्षा करतो ‘, असे वक्तव्य राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना केले. राजेश टोपे यांच्या या विधानातून लॉकडाऊनला जवळपास पूर्णविराम मिळू शकतो, असेही संकेत आता मिळू लागले आहेत.  

 आज राज्यात सध्या अनलॉकचा पाचवा टप्पा सुरू आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाउन वाढवत असताना मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ५ ऑक्टोबर पासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारचे शटर पुन्हा खुले झाले आहे. ५० टक्के ग्राहक क्षमतेच्या अटीवर हा व्यवसाय सुरू करण्यात झाला आहे. 

Related Posts
1 of 1,359


करोनाच्या अनुषंगाने त्यांना गाइडलाइन्सही देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे राज्यांतर्गत रेल्वे वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. एसटी सोबतच खासगी बस वाहतूकही १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. त्यात आता धार्मिक स्थळे, शाळा, व्यायामशाळा आणि मुंबईतील लोकलसेवा पूर्ववत कधी होणार, याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. त्याबाबत विरोधकही सातत्याने मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार गंभीरपणे या सर्वाचा विचार करत असून राज्याची त्यादिशेने वाटचाल सुरू झाल्याचे टोपे यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे.  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: