नुकसानभरपाई न दिल्याने शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या मॅनेजरला केली मारहाण  

0 30

यवतमाळ–  जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे  खरीप हंगामा मध्ये अतोनात नुकसान झाले, मात्र विमा कंपनी ने मोजक्याच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी खासदार भावना गवळी यांनी विमा कंपनी वर मोर्चा काढला. या वेळी शिवसैनिक जवाब विचारण्यासाठी विमा कंपनी च्या कार्यालयात गेले असता मॅनेजरने समाधान कारक उत्तर न दिल्याने संतप्त झालेल्या संतोष ढवळे यांनी मॅनेजरला मारहाण केली.

गेल्या वर्षी खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यातील 4 लाख 67 हजार 21 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्यासाठी या शेतकऱ्यांनी 158 कोटी रु चा भरणा केला दुर्दैवानं अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन , कापूस पीका चे मोठे नुकसान झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला। आशा परिस्थितीत ही विमा कंपनीने 9 हजार 776 शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई दिली उर्वरित 4 लाख 57 हजार 245 शेतकऱ्यांची दिशाभूल केली या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या बाबत संसदे मध्ये आवाज उठवू असे  खासदार भावना गवळी यांनी शेतकऱ्यांना संबोधित करतांना सांगितलं.

    हे पण पहा – बाळ बोठे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल  

शेतकऱ्यांच्या विम्याच्या मागणीसाठी खासदार भावना गवळी यांनी स्थानिक स्टेट बँक चौकातुन जवाब दो आंदोलनाला सुरुवात केली. त्या नंतर आंदोलक जवाब विचारण्यासाठी विमा कंपनी च्या कार्यालयात गेले. या ठिकाणी मॅनेजरने समाधान कारक उत्तर न दिल्याने यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे चांगलेच संतापले। त्यांनी मॅनेजर ला खुर्चीतून ओढून मारहाण केली. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत शिवसैनिकांना शांत केलं.

Related Posts
1 of 1,291

आपल्या दमडी दमडीचाही हिशोब त्यांनी ईडीला द्यावा – आशीष शेलार 

आजच्या या आंदोलनात जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.आंदोलना दरम्यान विमा कंपनी च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलणातून सेनेतील गटबाजी उघड झाली झाली. पालक मंत्री संजय राठोड यांचा कोणत्याही बॅनर वर फोटो वापरण्यात आला नाही. शिवाय पालकमंत्री गटाचा एकही पदाधिकारी आंदोलन दरम्यान तिकडे फिरकला नाही. किमान शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेने एकत्रित पने रस्त्यावर उतरावं अशी चर्चा  शेतकऱ्यांमधून ऐकला येत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: