निशिकांत कामत इज नो मोर


मुंबई : सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक निशिकांत कामत यांचे सोमवारी वयाच्या ५० वर्षी दुपारी ४ वाजून २४ मिनिटांनी निधन झाले . त्यांना कावीळ झाली होती आणि हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार चालू होता. डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न चालू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला,. त्यांचा जन्म १७ जून १९७० ला दादर येथे झाला असून लेखन, अभिनय आणि दिग्दर्शनाची आवड त्यांना होती . फोर्स , द्रिश्यम, मदारी, लई भारी , सारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी आजवर केले होते .