अहमदनगर- निळवंडे धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई.


अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील धरणे सध्या तुडुंब भरले आहे, निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अभियंता मनोज डोके यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले होते. विद्युत रोषणाईमुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळी मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे. याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. धरणावर पहिल्यांदाच अशा पध्दतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सध्या धरणातून 5684 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.