निलेश राणेंच्या आरोपांना कवडीची किंमत नाही , शिवसेना नेत्याची खोचक टीका !

राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यामध्ये असलेले वाद राजकीय वर्तुळात नवीन नाहीत . आता नाणारमधील जमीन व्यवहारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नातेवाईकांचा सहभाग असल्याचा दावा निलेश राणे यांनी केला होता. राणेंच्या या दाव्यावर शिवसेनेने प्रतिउत्तर देत टोला लगावला आहे .शिवसेनेने म्हटले आहे कि – भाजपचे आऊटडेटेड झालेले नेते निलेश राणे यांच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही !
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ट्विट करीत निलेश राणेंवर निशाणा साधला आहे . त्यांनी म्हटले आहे -निलेश राणेंच्या या आरोपांना आम्ही कवडीची किंमत देत नाही. त्यांनी केलेले आरोप बेछूट आणि पोरकटपणाचे आहेत
शिवसेनेच्या प्रतिउत्तरानंतर निलेश राणे यांनीही विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. निलेश राणेंनी म्हटले आहे – खासदार विनायक राऊत यांना शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळं जगामध्ये कोणालाच किंमत नाही असं त्यांना वाटतं. माझ्यावरचा त्यांचा राग मी समजू शकतो .