निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरित करणाऱ्या दुकानदारांविरुध्द कडक कारवाई – छगन भुजबळ अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री

मुंबई – शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून खराब दर्जाचे अन्नधान्य वितरित करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत, असे असताना सुद्धा काही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारींची दखल अन्न, नागरी आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी घेऊन कडक कारवाई करण्याच्या इशारा छगन भुजबळ यांनी दिलाय.
राज्यातील शिधापत्रिका वाटप करणारर सांगूनही ऐकत नसतील तर कारवाई करावी करण्यासाठी दक्षता पथकामार्फत या दुकानाची अन्नधान्याच्या दर्जाबाबतची तपासणी केली असता आढळुन आलेल्या त्रुटींसंदर्भात जीवनावश्यक वस्तु कायदा, 1955 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
अधिकृत शिधावाटप दुकान क्र .27/ग/189 (गोरेगाव) या दुकानाची अनुक्रमे दि. 7 सप्टेंबर व दि.16 सप्टेंबर रोजी संपूर्ण तपासणी घेतली असता एकुण 54 किलो तांदूळ आणि 61 किलो गहू कमी आढळून आला त्या अनुषंगाने संबंधित दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना वितरित केलेले अन्नधान्य शासनमान्य दर आणि परिमाणानुसार वितरित केले आहे किंवा कसे? याची खातरजमा करण्याकरीता दुकानास संलग्न असलेल्या शिधापत्रिकाधारकाच्या गृहभेटी देऊन पडताळणी केली असता अनुक्रमे 370 किलो तांदूळ, 525 किलो गहू कमी वितरित केल्याचे आढळून आले. अशा प्रकारे अधिकृत शिधावाटप दुकानदाराने एकुण 424 किलो तांदूळ आणि 586 किलो गहू अशा एकुण रु.31,530.72 इतक्या रकमेच्या अन्नधान्याचा अपहार केल्याने अधिकृत शिधावाटप दुकानदाराविरुध्द बांगूरनगर पोलिस ठाणे, गोरेगाव, मुंबई येथे 36/2020 दिनांक 18.09.2020 रोजी गुन्हा नोंद केला असून दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आहे तसेच या प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावरही नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
कोणीही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य वितरित करण्याचा प्रयत्न करीत असल्यास कार्यालयाच्या हेल्पलाईन क्र.022-22852814 तसेच ई-मेल आयडी dycor.ho-mum@gov.in यावर संपर्क साधावा जेणेकरून अशा अधिकृत शिधावाटप दुकानदारांविरूध्द कारवाई करणे शक्य होईल, असे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यानी कळविले आहे.