DNA मराठी

ना. बाळासाहेब थोरात यांनी ९०२८७२५३६८ क्रमांक हेल्पलाईन म्हणून केला जाहीर

0 158

नगर : कोरोना संदर्भातील अडीअडचणीत्याचबरोबर नगर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक – ९०२८७२५३६८ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी स्वतः नगरकरांसाठी जाहीर केला आहे.

काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ना.थोरात यांच्या हस्ते काळे यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक नगर शहरातील नागरिकांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हेल्पलाईन म्हणून जाहीर करण्यात आला. यावेळी आ. डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, माजी महापौर दीप चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. थोरात म्हणाले की, सध्या नगर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. प्रशासन यासाठी अहोरात्र काम करत आहे. नागरिकांना या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची आवश्यकता भासल्यास अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आमचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे २४ तास नगरकरांसाठी उपलब्ध आहेत. 

Related Posts
1 of 2,452

कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी नगर मधील नागरिकांनी काळे यांच्या मोबाईल क्रमांकावरती थेट संपर्क साधावा. ते आपल्याला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत तातडीने मिळवून देण्यासाठी आपल्याला सहकार्य करतील असे प्रतिपादन यावेळी ना. थोरात यांनी केले.

यावेळी किरण काळे म्हणाले की, आमचे नेते महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि माध्यमातून नगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोना, त्याचबरोबर इतर कोणत्याही मदतीसाठी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून मी २४ तास उपलब्ध आहे. 

रात्री-अपरात्री कोणत्याही अडीअडचणी मध्ये कोणत्याही प्रसंगी नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असेल तर त्यांनी माझ्याशी निसंकोचपणे संपर्क साधावा. हेल्पलाईन म्हणून दिलेला नंबर हा माझा वैयक्तिक नंबर असून तो नंबर माझा कोणी स्वीय सहाय्यक नाही तर मी स्वतः तो नंबर उचलतो. नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असेल, असे प्रतिपादन यावेळी काळे यांनी केले.

नगर शहराबरोबरच नगर जिल्ह्यातील देखील वेगवेगळ्या तालुक्यांचे लोक कोरोना मुळे उपचार घेण्यासाठी नगर शहरामध्ये येत असतात. त्यांना देखिल अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांनी देखील संपर्क साधण्याचे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष काळे यांनी केले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: