ना नफा ना तोटा या तत्त्वावर रत्नदीप फोंडेशनचे कोवीड सेंटर दिलासादायक – रोहीत पवार

जामखेड – कोवीड रूग्णांची वाढती संख्या पाहून येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशनने ना नफा ना तोटा या तत्त्वावर कोवीड सेंटर उभारून रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे त्यांनी १०० बेड उपलब्ध केले असून २० बेड आँक्सीजन सुविधा देणारे आहे. डॉ. भास्करराव मोरे यांनी मतदारसंघात कोवीड सेंटर उपलब्ध करून देऊन शासनाला सहकार्य करण्यासाठी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे असे आ. रोहीत पवार म्हणाले.
यावेळी बोलताना आ. रोहीत पवार म्हणाले, खाजगी रूग्णालयाकडून होणारी लूट पाहता रत्नदीप फोंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे यांनी सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध करून कोरोना रूग्णांना माफक दरात सुविधा उपलब्ध करून देणार आहे यासाठी त्यांनी दरफलक तयार केले आहेत तसेच तज्ञ डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी नियुक्त केले आहेत व रूग्णांना अत्यल्प दरात सेवा दिली जाणार आहे यापूर्वी त्यांनी क्वारंटाइनमध्ये असलेल्या नागरिकांची सेवा मोफत करून रुग्णांच्या प्रती संवेदना व्यक्त केली आहे. यापुढील काळात त्यांनी अशीच सहकार्याची भावना ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्करराव मोरे पाटील म्हणाले, कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात सामाजिक बांधिलकी जपून फौंडेशनने खाजगी कोवीड सेंटरची निर्मीती केली आहे. १०० बेड उपलब्ध करून दिल्या असून २० बेड आँक्सीजन युक्त आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर सदर सेंटर चालू केले आहे तसेच तज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत रूग्णांची अर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी आम्ही सेंटर स्थापन केले आहे. तसेच खासगी कोवीड रूग्णालयाने रुग्णांना फि मध्ये सवलत देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन डॉ. भास्करराव मोरे पाटील यांनी केले आहे.
हमीभाव खरेदी केंद्रावर बाजरी घेण्यात यावी अशी मागणी शरद ढवळे, ज्ञानदेव ढवळे, प्रदीप दळवी,अशोक पठाडे,रवींद्र ढवळे यांनी केली यावर आ. रोहीत पवार यांनी आपण संबधीत फेडरेशन बरोबर चर्चा करून बाजरी खरेदी करण्यासाठी परवानगी मिळवून देण्याची ग्वाही दिली.
जामखेड कर्जत रस्त्यावर रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेच्या वतीने कोवीड १९ सेंटर या हॉस्पिटलचे उदघाटन आ. रोहीत पवार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे पाटील, प्रदीप दळवी ,पल्लवी सगळे आदी उपस्थित होते.