नारायण मंगलाराम यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर


अहमदनगर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राहुरीतील गोपाळवाडी येथील प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलाराम यांना जाहीर झालाय . सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारावर नगर जिल्ह्याने नाव कोरले आहे . ५ सप्टेंबर रोजी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार दिले जाणार असून सुवर्णपदक , मानपत्र आणि ५१ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .