नागपुरामध्ये १५ वर्षीय तरुणीवर बलात्कार 

0 51

नागपूर – नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. ही घटना जवळपास दीड महिन्यापूर्वी नारा गावाजवळ घडली होती. दीड महिन्यानंतर पिडीताने  पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्याच्या तक्रारीनुसार चार आरोपींना अटक केली आहे.   

पीडितेच्या घराजवळ राहत असलेला आरोपी यश मेश्राम याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच इतर तीन अमित बोलके, अभिनेश देशभ्रतार, रितिक मोहरले यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

Related Posts
1 of 1,357

पोलीस सध्या या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे पीडित तरुणी घाबरली होती या मुळे त्यानी पोलिसात तक्रार केली नव्हती. परंतु दीड महिन्यानंतर पीडितेच्या तक्रारीनुसार चार आरोपींना  पोलिसांनी अटक केली आहे .  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: