नवाझुद्दीन सिद्दीकीवर पत्नीचा बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप !

0 54

बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे . गेल्या काही दिवसांपासून तो
पत्नीसोबत असलेल्या वादातून चर्चेत आहे. आलिया सिद्दीकी असे त्याच्या पत्नीचे नाव आहे , तिने नवाझुद्दीन सिद्दीकीवर बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. याप्रकरणी तिने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात लेखी तक्रारदेखील दाखल केली आहे.

केवळ नवाझुद्दीन सिद्दीकीवर च नाही तर आलियाने त्याच्या कुटुंबातील 4 अन्य सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. काही महिन्यापूर्वीच त्यांच्या वैवाहिक जीवनातील वाद चव्हाट्यावर आले होते .मागील महिन्यात आलियाने नवाझुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती.

Related Posts
1 of 131

आलियाने केलेली हि दुसरी तक्रार आहे . या आधीच तिने उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरच्या बुढाना पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला आहे .झाल्या प्रकरणी पोलीस आता नवाझुद्दीनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: