DNA मराठी

नगर मधील मुळा धरण ९८ टक्के भरले

0 84

अहमदनगर- एकूण २६ दशलक्ष घनफुट(टीएमसी) क्षमता असणारे मुळा धरण ९८ टक्के भरले आहे.            
अहमदनगर शहरला पाणी पुरवणारे मुळा धरण २५ हजार ४३८ दशलक्ष घनफूट साठा होऊन धरण ९८ टक्क्याने भरला आहे.आज सकाळी १० वाजता धरणाच्या ११ दरवाजांमधून सुमारे २००० क्युसेक्स इतका पाणी विसर्ग मुळा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. सदरहू मुळा धरणातून सोडलेले पाणी थेट जायकवाडी धरणामध्ये जाऊन पोहोचते.
           महत्त्वाचे म्हणजे या धरणाच्या द्वारे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, शेवगाव, नेवासा, पाथर्डी तालुक्यांतील सुमारे १२५००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते व त्याचप्रमाणे नगर शहर, नगर एमआयडीसी , महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, नगर परिषद राहुरी,४ सहकारी साखर कारखाने या सर्वांना तसेच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना पिण्याचे पाणी देखील या धरणांमधून पुरवले जाते. धरण भरल्यामुळे लाभक्षेत्रात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

Related Posts
1 of 2,489
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: