DNA मराठी

नगर जिल्ह्यात दरोडेखोरांची दहशत 

0 128

 अहमदनगर-  नगर जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू आहे. विसापूरफाटा आणि निर्मळपिंपरी येथील दरोडा आणि खुनाच्या घटना झाली असतानाच आता परत बुधवारी रात्री नगर शहराजवळील केडगाव येथे धाडसी दरोडा पडला.

चारदरोडेखोरांनी रात्री घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करत पाच तोळेसोन्याचे दागिने ओरबाडून  गेले. या घटनेने केडगाव परिसरात एक खळबळच उडालीअसून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Related Posts
1 of 2,492

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात रमाकांत महादेव पराळे (वय ५५) यांनी फिर्याद दाखल केली आहे. बुधवारी रात्री ११. ४५ वाजेच्या सुमारास चार दरोडेखोर पराळे यांच्या घरात घुसले. यावेळी घराबाहेर झोपलेल्या पराळे यांच्यामेव्हण्यास बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी केली.दुसऱ्या दरोडेखोरांने पराळे यांना बंदुकीच्या मागील बाजूने डोक्यात व पोटातमारहाण करून त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची चैन काढून घेतली यावेळीअणखी एका दरोडेखोरांनी त्यांच्या पाठीला चाकू लावून पुन्हा लाथाबुक्क्यांनीमारहाण केली.

या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनीघटनास्थळी जाऊन माहिती घेतली.दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यानजिल्ह्यात गेल्या दोन तीन महिन्यांपासून लूटमार, दरोडे आणि खुनाच्या घटनावाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सराईत गुन्हेगारांचा बीमोडकरण्यास पोलिसांना पुरते अपयश आल्याचे या घटनांवरून दिसत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: