नगर जिल्हात सीआयडीचा नाव घेत फसवणूक 

1 37

अहमदनगर- येथील श्रीगोंदा  येथे  सीआयडी अधिकारी असल्याचे सांगत हातचलाखी करून एक तोळ्याची सोन्याची साखळी चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे . या प्रकरणी भीमराव कुशाबा कवडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीमराव कवडे हे काल दुपारी श्रीगोंदा येथून जाणाऱ्या जामखेड ते काष्टी या रस्त्यावर उभे होते. त्यावेळी एका विनानंबरच्या दुचाकी वरून दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यापैकी एकाने मी सीआयडीचा अधिकारी आहे. पुढेच्या गावात दंगल झाली आहे. त्यामुळे तुमच्या हातातील घड्याळ आणि गळ्यातील सोन्याची साखळी सांभाळून ठेवा. त्यानुसार कवडे यांनी गळ्यातील सोन्याची साखळी काढून खिशात ठेवली. त्यावेळी संबंधित व्यक्तीने साखळी रुमालात बांधून खिशात ठेवा, असे सांगत कवडे यांच्यासमोर रुमाल धरला.

Related Posts
1 of 1,371

तसेच रुमालात कवडे यांच्या हातातील घड्याळ आणि गळ्यातील सोन्याची साखळी बांधून ठेवत असल्याचे जाणवत सोन्याची साखळी हातचलाखीने काढून घेत संबंधित व्यक्तीने चोरून नेली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कवडे हे पोलीस ठाणेमध्ये गेले,त्यानंतर कवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात काल दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल झुंजार हे करत आहे.

Show Comments (1)
error: Content is protected !!
%d bloggers like this: