DNA मराठी

नगर जल्लोषच्यावतीने मनपा सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कारसफाई कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात केलेले काम कौतुकास्पद : अँड. धनंजय जाधव

0 63
Related Posts
1 of 2,489

अहमदनगर  : सामाजिक जाणिवेतून संत गाडगेबाबा यांना स्वच्छतेची मशाल हाती घेऊन शहर व गावोगावी जाऊनहातात झाडू घेऊन स्वच्छता करीत असे व समाजामध्ये जनजागृती करत होते. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे,म्हणून कीर्तनाद्वारे सांगत असे. समाजाचे आरोग्य अबाधित राहण्याचे काम आता मनपा सफाई कर्मचारी दररोज पहाटेकुठलाही खंड न पडता करत आहेत. तोफखाना परिसरातील सफाई कर्मचारी कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये अगदीकॅन्टोन्मेंट झोन असतानाही आपल्या आरोग्याची पर्वा न करता नागरिकांना धीर देत प्रभागातील स्वच्छता करीत होते.कोरोनाच्या काळामध्ये नागरिक भयभीत झाला आहे. परंतु आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपलीजबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, हाच त्यांचा उद्देश आहे. नगर जल्लोषनेमनपा सफाई कर्मचाऱ्यांची सामाजिक भावनेतून त्यांचा सत्कार करून सन्मानपत्र देण्याचा उपक्रम उल्लेखनीय आहे,असे प्रतिपादन मा. नगरसेवक अँड. धनंजय जाधव यांनी केले.  अहमदनगर मनपाचे तोफखाना भागातील सफाई कर्मचाऱ्यांचा नगर जल्लोषच्यावतीने सत्कार करुनसन्मानचिन्ह देताना मा. नगरसेवक अँड. धनंजय जाधव. समवेत आरोग्यदूत सागर सुरपुरे,अध्यक्ष सागर बोगा स्वच्छतानिरीक्षक बाळासाहेब विधाते, राजेंद्र सामल, राजू पठाडे, संतोष वैरागर, गोरख भालेराव व सफाई कर्मचारी यावेळीउपस्थित होते.  यावेळी बोलताना अँड. जाधव म्हणाले की, तोफखाना भागामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादर्भाव मोठ्याप्रमाणात वाढला होता. त्यावेळी या भागातील नागरिक भयभीत झाले होते. मात्र सफाई कर्मचाऱ्यांनी प्रभागातीलनागरिकांना धीर देण्याचे काम केले होते. तसेच प्रभाग स्वच्छ ठेवण्याचे काम, सफाई कर्मचारी हा प्रत्यक्ष आपआपलीजबाबदारी पार पाडत असतो. त्यांचा सन्मान होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मी सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा आभारी आहे- असल्याचे ते म्हणाले. कोरोना महामारीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावल्यामुळे नगर जल्लोष परिवाराच्यावतीने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून कोरोना वॉरियर्स २०२० चा पुरस्कारमनपा सफाई कर्मचारी यांना देण्यात आला. सर्व नागरिकांनी कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्व अटी व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यावेळी ट्रस्टचे रत्नाकर श्रीपत, अजय म्याना, संतोष दरांगे, सचिन बोगा, अक्षय आंबेकर, सुनील मानकर, राकेश बोगा, गणेश साली, दीपक गुंडू, रोहित लोहार, महेश बल्ला, निलेश मिसाळ, योगेश म्याकल, प्रशांत भंडारी, विकास जाधव, विराज म्याना, ज्ञानेश्वर भगत, अक्षय हराळे, राहुल आडेप, अमोल तांबे आदींनी परिश्रम घेतले आहे. नगर : अहमदनगर मनपाचे तोफखाना भागातील सफाई कर्मचाऱ्यांचा नगर जल्लोषच्यावतीने सत्कार करुनसन्मानचिन्ह देताना मा. नगरसेवक अँड. धनंजय जाधव. समवेत अध्यक्ष सागर बोगा, अरोग्यदूत सागर सुरपुरे, स्वच्छतानिरीक्षक बाळासाहेब विधाते, राजेंद्र सामल, राजू पठाडे, संतोष वैरागर, गोरख भालेराव व सफाई कर्मचारी यावेळीउपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: