DNA मराठी

नगर-कल्याण महामार्गावर वडगाव आनंद इथे पिकअप आणि टेम्पोचा भीषण अपघात

0 88

अहमदनगर:गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशात पुण्यातील जुन्नरमध्ये भीषण अपघातात ४ जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण-नगर महामार्गावर वडगाव आनंद इथे पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक झाली. या अपघात इतका मोठा होता की, यामध्ये ४ जण जणांचा जीव गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दांगटमळ्याजवळ आज पहाटे टाटाच्या जितो आणि आयशर ट्रकमध्ये सामोरा-समोर धडक झाली. यासंबंधीची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.

Related Posts
1 of 2,489

अपघातात टाटा कंपनीच्या जितो या ३ चाकीचं मोठं नुकसान झालं आहे. सदरची जितो टेम्पो क्रमांक MH१६ CC ६३८८ मुंबईकडून आळेफाटा बाजूस येत होता तर आयशर टेम्पो MH १६ AE ९०८० आळेफाटा बाजुकडून कल्याण दिशेने चालला होता. मृतांमधील ४ जण जितोमधील असून दोघांचा घटनास्थळी जागीच मृत्यु झाला आहे तर एकाचा आळेफाटा इथल्या रुग्णालयात तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मृतांमधे जितोच्या चालक व वाहकासह अन्य दोघांचा समावेश आहे. तर आयशरचा चालक किरकोळ जखमी झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: