नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

अहमदनगर- कालच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज एका ट्विट द्वारे आपण कोरोना पॉझिटिव असल्याची माहिती दिली आहे .आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तीने स्वतःची काळजी घेऊन आपली चाचणी करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यामुळे जिल्ह्यातील अनेक मोठे नेते तसेच शासकीय अधिकारी यांच्या संपर्कात आले होते त्यामध्ये शहराचे आमदार, महापौर आणि जिल्हाधिकारी यांच्या सुद्धा समावेश होता.
जिल्ह्यामध्ये लोकडाऊन लागणार नाही परंतु गरज पडल्यास तुम्ही स्थानिक पातळीवर तुमच्या पद्धतीने निर्णय घ्या यात प्रशासनाच्या काही सहभाग नसेल असे काल त्यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर सांगितले होते.