धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणारा तरुण अटक

0 41

रांची – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेन्द्र सिंह धोनी याची मुलगी जीवाबाबत सोशल मीडियावर अभद्र टिप्पणी प्रकरणात रांची पोलिसांनी प्राथमिक गुन्हा दाखल करुन घेत त्याचा तपास सुरू केला आहे होता या तपासातून राची पोलीसांनी एका मुलाला गुजरातमधून अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात आयपी एड्रेसमधून अभद्र टिप्पणी आणि धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर कारवाई करीत एका मुलाला अटक करण्यात आली आहे.

यापूर्वी धोनीच्या कुटुंबाची परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांनी  ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रांची पोलिसांनी टेक्निकट टीम या प्रकरणात तपास करीत होती. तपासात गुजरातच्या आयपी एड्रेसमधून मॅसेज पाठविल्याची माहिती समोर आल्यानंतर धोनीच्या घरावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Related Posts
1 of 1,403

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रांची पोलिसांच्या सूचनेवरुन गुजरात पोलिसांनी सगीर नावाच्या तरुणाला अटक केली आहे. तो १२वीचा विद्यार्थी आहे आणि कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा तहसीलमधील नाना कपाया गावात राहणारा आहे. गुजरात पोलिसांनी सगीरला आता रांची पोलिसांच्या हवाले करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

काय होते प्रकरण
आयपीएलच्या तेराव्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा १० धावांनी पराभव झाला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानेही फारशी चांगली कामगिरी केली नाही. त्यानंतर सोशल मीडियावरुन धोनीवर टीका केली जात होती. यातच काही विकृत नेटकाऱ्यांनी चक्क धोनीच्या ६ वर्षांच्या मुलीला बलात्काराची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: