धनगर समाज करणार राज्यभर ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन

सांगली – धनगर आरक्षणाबाबत मागच्या १० महिन्यापासून झोपी गेलेली सरकारच्या विरोधात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात ‘ढोल बजाओ, सरकार जगाओ’ अशा आंदोलन करण्याची घोषणा पडळकर यांनी केलीय. सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पडळकर यांनी हे आंदोलनाची घोषणा केलीय.
धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आता धनगर समाज आक्रमक झालेला आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमधून राज्य सरकार विरोधात आंदोलनाच्या इशारा दिला आहे. २५ सप्टेंबर रोजी या झोपलेली सरकारला जागे करण्यासाठी राज्यभर “ढोल बजाव, सरकार जगाव” हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे.
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आपण मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवून तातडीने या मुद्द्यावर निर्णय घेण्याची मागणी केली होती. परंतू सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत दुजाभाव होत आहे. आता समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे पडळकर यांनी सांगली येथे म्हंटले आहे.