धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपा महिला आक्रमक

0 24

यवतमाळ – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज भाजपा महिला आघाडी चांगलीच आक्रमक झाली असून यवतमाळ जिल्ह्याधिकरी कार्यालया समोर निदर्शन करून आंदोलन केले. राजीनामा न दिल्यास भविषयत आणखी तीव्र करण्याचा इशारा सुद्धा दिला. या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यावेळी सारकर्व्हा विरोधात आयुध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मंत्री धनंजय मुंढे यांच्यावर करुणा शर्मा या महिलेने अत्याचाराचा आरोप केला तेव्हा पासून राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे.आता भाजपची महिला आघाडी सुद्धा आक्रमक झाली आहे. मुंडे यांचा राजीनामा ची मागणी धरत आज संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले.

Related Posts
1 of 1,292

सामाजिक न्याय मंत्री हे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी असतात. मात्र, मुंडे यांच्या विरुद्ध एका महिलेने गंभीर तक्रार केली आहे. त्या नंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गप्प आहेत . मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा देऊन खुर्ची खाली करावी, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: