धनंजय मुंडे प्रकरणाचा विषय मागे पडला आहे.. – पंकजा मुंडे

0 30

औरंगाबाद –  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर मागच्या काही दिवसापूर्वी रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप लावला होता यामुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे चर्चेत आले होते. मात्र याप्रकरणात भारतीय जनता पक्षाचे सर्वच नेते धनंजय मुंडेंच्या राजीनामा मागत होते. तर दुसरीकडे या प्रकरणात पंकजा मुंडे यांनी काहीच प्रतिकिया दिली नव्हती. मात्र आता याप्रकरणात औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमाशी बोलताना पंकजा मुंडे यांनी आपली पहिली प्रतिकिया दिली आहे.

धनंजय मुंडे प्रकरणावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की धनंजय मुंडे प्रकरणाचा विषय मागे पडला आहे. नैतिक, कायदेशीर आणि तात्विक दृष्ट्या या गोष्टींचे समर्थन मी करु शकत नाही. तरी अशा गोष्टीने कुटुंबाला त्रास होतो. नातं म्हणून आणि महिला म्हणून मी या गोष्टीकडे संवेदनशीलपणे पाहते. हा विषय कुणाचाही असता तरी, राजकीय भांडवल केलं नसतं आणि करणारही नाही. बाकी इतर गोष्टींचा निकाल भविष्यात लागलेच .

नाना पटोलें यांच्या या मागणीमुळे काँग्रेस हायकमांड नाराज ?

तर  जातीनिहाय जनगणनावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाले कि ओबीसा जनगणना झाली पाहिजे, ही मागणी मुंडे साहेबांनी वेळोवेळी संसदेत मांडली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनीही यासंदर्भात संसदेत आवाज उठवला आहे. अशातच आता जनगणना होणार आहे, त्यामुळे जनगणना होत असताना यासंदर्भात सकारात्मक पावलं उचलली गेली पाहिजे. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल. त्यामुळे समाजाला न्याय देण्यास मदत होईल.

Related Posts
1 of 1,292

 नागपुरचे निकरवाले तमिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही – राहुल गांधी

ओबीसी जनगणना व्हावी ही आमची मागणी आहे. यासंदर्भात काल मी ट्वीट हिंदीत केलं होतं. त्याचा वेगळा अर्थ काही नाही. राष्ट्रीय स्तरावर काम करते म्हणून हिंदीत ट्वीट केलं, इतकाच अर्थ आहे. तसेच काल मोर्चात ओबीसी मुख्यमंत्री व्हावा असे बॅनर होते, त्याचा माझ्याशी संबंध जोडू नका. असंही पंकजा मुंडे यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे.

बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर पुढच्यावेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: