धक्कादायक २८ आरोपीना कोरोना….

कर्जत – तालुक्यात न्यायालयीन कस्टडीत व पोलीस कष्टडीत असलेल्या ४९ कैद्यापैकी २८ कैदीना कोरोना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली आहे.
येथिल उपकारागृहामध्ये एकूण एकोणपन्नास आरोपी आहेत यामध्ये ४८ पुरुष तर एक महिला आहे.
या पैकी न्यायालयीन कोठडीत ४२ आरोपी आहेत तर सात आरोपी पोलिस कस्टडीत आहेत, आज या सर्व आरोपींची कोरोनाची अँटीजेनिक टेस्ट करण्यात आली यामध्ये अठ्ठावीस आरोपी कैदी कोरोना चाचणी सकारात्मक असल्याचे आढळले आहे.याबाबत तहसीलदार नानासाहेब आगळे यांना अहवाल पाठविला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली आहे.
पुढील आदेशाप्रमाणे या आरोपींना कोठे ठेवायचे याचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.