धक्कादायक! राजकीय प्रतिस्पर्ध्यामुळे भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

0 30

अमेठी –  उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहे . यासाठी प्रत्यके पक्षाने तसेच इच्छुक उमेदवाराने आपली आपली तयारी जोराने सुरु केली आहे.  मात्र उत्तर प्रदेशमधील अमेठीमधून एक धक्कादायक बातमी सोमोर आली आहे. अमेठी जिल्ह्यातील मोहनगंज पोलीस स्टेशन भागात सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या एक नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.  ६४ वर्षीय भाजपा नेते जागेश्वर वर्मा  यांच्या हत्येमुळे संपूर्ण अमेठी मध्ये एकच खळबळ उडाली आहे.   गावातील विद्यमान प्रमुखांच्या कुटुंबानेच राजकीय प्रतिस्पर्ध्यामुळे भाजपा नेते जागेश्वर वर्मा यांची हत्या केल्याचा आरोप  जागेश्वर वर्मा यांच्या  मुलाकडून करण्यात आला आहे.  जागेश्वर वर्मा  यांच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन जणांविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे.

         संगमनेरमध्ये रस्त्यावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिसांकडून दोन संशयित ताब्यात 

मिळालेल्या माहितीनुसार जागेश्वर वर्मा हे रविवारी सकाळी घरातून निघाल्यानंतर रात्री ९  वाजले तरी घरी परतले नाहीत. त्यांना वारंवार फोन केला असता त्यांनी उचलला नाही. अखेर कुटुंबाने त्यांचा शोध सुरू केला. यावेळी घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर जागेश्वर यांचा मृतदेह सापडला. त्यांची अतिशय निर्घृणपणे  गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती . तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जागेश्वर यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  एक गोळी छातीमध्ये लागल्यामुळे जागेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला .अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

 बायको दुसऱ्या सोबत पळून गेल्यामुळे चक्क! एक नव्हे तर १८ महिलांची केली हत्या 

Related Posts
1 of 1,292

भारतीय जनता पक्षाचे नेते जागेश्वर वर्मा यांच्या हत्येप्रकरणी सध्याची प्रमुख अंकिता सिंह तिचा पती दान बहादुर सिंह, भाऊ वीर बहादुर सिंह आणि मुलगा अखिलेश प्रताप सिंह यांच्या विरोधात फिर्याद  दाखल करण्यात आली  आहे. सध्या हे तिघेही फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: