धक्कादायक : ‘या’ मराठी मालिकेच्या सेटवर २७ जणांना कोरोनाची लागण !

भारत देशाभोवती दिवसेंदिवस कोरोचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. कित्येक राजकारणी मंडळी आणि दिग्गज कलाकारांना कोरोनाची लागण होत आहे.आता तर चक्क एका प्रसिद्ध मराठी मालिकेच्या सेटवरील तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे .सुरुवातीच्या काळात लॉकडाउनमध्ये चित्रीकरणाला बंदी होती ,मात्र ही बंदी आता हटली आहे .सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे.
आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे .सोनी मराठीवरील ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सातारा जिल्ह्यात या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. एकाच सेटवरील २७ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे , त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
या मालिकेत फेमस अभिनेत्री अलका कुबल देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत.माहितीनुसार ,या ठिकाणी एक डान्स ग्रुप चित्रीकरणासाठी गेला होता तेव्हा कोरोनाचा फैलाव झाला असावा .