धक्कादायक : भाजप आमदाराच्या मामाची गोळ्या घालून हत्या !

0 25

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे .भाजपचे आमदार अजित पाल यांच्या मामाची हत्या करण्यात आली आहे.त्यागी यांचे मामा नरेश त्यागी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली . नरेश त्यागी हे सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉक ला गेले होते तेव्हा हा धक्कादायक प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,नरेश त्यागी पहाटे सहाच्या सुमारास घराबाहेर फिरत होते ,त्यावेळी अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला.त्यागी याना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला .

Related Posts
1 of 1,357

नरेश त्यागी हे कंत्राटदार होते. झालेला सर्व प्रकार त्यागी यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. कॅमेरा फुटेजच्या मदतीनं पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: