धक्कादायक.. प्रीफेक्चुरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासानुसार मानवी त्वचेवर ९ तास कोरोना जिवंत राहू शकतो

0 45

टोकियो- कोरोना वायरस संबंधित एक रिसर्च करताना जपानच्या क्योटो प्रीफेक्चुरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनने एक दावा केला आहे. या दावेमध्ये असे म्हटले आहे की कोरोना बरेच तास मनुष्याच्या त्वचेवर टिकून राहू शकतो. जर त्याला अनुकूल वातावरण प्राप्त झाले तर ते मानवी त्वचेवर सुमारे ९ तास कोरोना जिवंत राहू शकेल. रिसर्च नुसार या टीमने अनेक प्राणी आणि मानवांच्या त्वचेवर कोरोना अस्तित्वा संदर्भात अभ्यास केला.


या अभ्यासात टीमला असे आढळले आहे की कोरोना इन्फ्लूएंझा-A व्हायरसपेक्षा जास्त काळ मनुष्यांच्या त्वचेवर टिकू शकतो. शास्त्रज्ञांच्या पथकाने या अभ्यासात असे म्हटले आहे की वारंवार हात स्वच्छ करणे किती आवश्यक आहे हे सिद्ध करते. संशोधन पथकाच्या म्हणण्यानुसार, सॅनिटायझर वापरण्यापेक्षा पाण्याने हात धुणे नेहमीच फायदेशीर ठरते.


दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा असा अंदाज व्यक्त केला आहे की जगभरात दर दहामाणसांमागे एक व्यक्ती करोनाने बाधित झाला असावा, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख मायकल जे रेयान यांनी व्यक्त केला आहे.

Related Posts
1 of 1,389

जागतिक आरोग्य संघटनाच्या ३४ सदस्यांच्या बोर्डाच्या बैठकीत ते बोलत होते. “विविध वयोगटा मधील तसेच शहरी ते ग्रामीण भागात हा आकडा वेगवेगळा असू शकते. पण जगातील मोठया लोकसंख्येला करोनापासून धोका कायम आहे” असे रायन म्हणाले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: