धक्कादायक : नोटांमधूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार !

0 37

देशात सध्या कोरोनाचा कहर माजला आहे. हा प्रसार रोखावा म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत पण त्याचा फायदा होताना दिसत नाही . अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे . रिझर्व्ह बँकेने माहिती दिली आहे की, नोटांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. या माहितीमुळे सर्वांची चिंता वाढली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की , नोटा या कोरोनाचे संभाव्य वाहक असू शकतात. तसेच डिजिटल पेमेंटस प्रोत्साहन देण्याची मागणी लोकांना केली आहे .दरम्यान काही महिन्यांपूर्वी सीएआयटीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून नोटा विषाणूंचे वाहक आहेत का? असा प्रश्न विचारला होता .

Related Posts
1 of 1,359

आता मंत्रालयाकडून कोरोना व्हायरससह बॅक्टेरिया आणि विषाणूंचे वाहक असू शकतात अशी सूचना सीएआयटीला दिली गेली आहे .तसेच नोटांच्या माध्यमातून प्रसार रोखण्यासाठी डिजिटल पेमेंटचा अधिकाधिक वापर केला पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: