देशभरात सध्या कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोना सारख्या भयानक विषाणूने देशात ९० हजार पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. आतादेखील राजकीय वर्तुळात शोककळा पसरवणारी एक दुःखद घटना घडली आहे . कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांना कोरोनाची लागण झाली होती . देवळेकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.ते कोरोनातून बरे झाले होते मात्र यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले.
राजेंद्र देवळेकर त्यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच देवळेकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती .देवळेकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळ शोककळा पसरली आहे राजकारणी, लोकप्रतिनिधी यांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे..
देशात सामान्यांसहित अनेक नेत्यांना, डॉक्टरांना , पोलिसांनी , अभिनेत्यानं कोरोनाने वेढलं आहे त्यामुळे सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे.