धक्कादायक :एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण !

देशात मोठा प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहेत.दर दिवशी सुमारे ९० हजारांहून जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत.भारतात वाढणारी रुग्णसंख्या पाहता WHO ने देखील चिंता व्यक्त केली आहे .सामान्य लोकांसहित राजकीय लोकांना देखील कोरोनाचा विळखा बसत आहे .
आता राज्याचे नगरविकास आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण झाली आहे. शिंदे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे .संपर्कातआलेल्या लोकांनी स्वतःची कोरोना टेस्ट करावी याची विनंती एकनाथ शिंदे यांनी केले आहे .
एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे कि – माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली आणि ती पॉझिटिव्ह आली .सगळ्यांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती ठीक आहे ,माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी ही विनंती.