दौंड- निमगाव खलू येथील भीमा नदीच्या पात्रात सापडली शंकराची भव्य मूर्ती

0 12

श्रीगोंदा  – अहमदनगर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या भीमा नदी पात्रातील दौंड व श्रीगोंदयाला जोडणाऱ्या रेल्वे पूलाजवळ भगवान शंकराचे मुख असलेली जवळपास शेकडो वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकामात सापडली आहे.

 भाजपाच्या दिग्गज नेत्यांना विजय मल्ल्यासारखं परदेशात पळून जावं लागेल – संजय राऊत

याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू व दौंड दरम्यान असलेल्या भीमा नदीवरील रेल्वे पुलाजवळ खोदकाम चालू असताना प्राचीन भगवान शंकराच्या मूर्तीचे तोंड सापडले आहे. या भव्य मूर्तीचे फक्त मुखच पाच फुट असून वजन एक टनाच्या आसपास आहे.त्यावरून मूर्तीची भव्यता स्पष्ट होते. दौंड-मनमाड रेल्वे लोहमार्गासाठी १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी कामाचा भव्य पूल उभारला आहे. या पूलाच्या बाजूलाच दुसऱ्या नवीन रेल्वे पूलाच्या पायाभरणीचे काम सध्या सुरु आहे.

Related Posts
1 of 1,291

याठिकाणी शनिवारी खोदकाम सुरू असतांना एका खड्यात ही  मूर्ती सापडली. कामागारांनी ही मूर्ती जेसीबीच्या सहाय्यानेबाजूला ठेवली आहे.स्थानिकांच्यामते ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली  आहे. मात्र, मूर्तीचे वजन जास्त असल्याने ही मूर्ती वाहून येऊ शकत नाही. ती जवळपासच्या ठिकाणची असल्याची माहिती काही तज्ञांनी व्यक्त केली. मूर्तीच्या मुखाचा भाग सापडला असून या नदीकाठी  परिसरात इतर अवशेष व प्राचीन मंदिर सापडण्याची शक्यता आहे. पुरातनकालीन मूर्ती दौंड परिसरातलीच असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे व गाळामुळे मूर्तीवर गाळ, वाळूचे थर जमा झाल्यामुळे मूर्ती बुजली गेली होती. याबाबत पुरातत्व खात्याकडून अधिक संशोधन केले तर प्राचीन इतिहास उलगडण्याची शक्यता आहे.

    शिवसैनिकांनी ईडीच्या कार्यालयालाच बनवले भाजपा प्रदेश कार्यालय

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: