दो गज की दूरी इथे दिसत नाही सुरभिच्या आयोजकांना शरद पवारांचा टोला

0 32

 अहमदनगर –   राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील नागरिकांना कोरोनाची लस आली असून सुद्धा मास्क  वापरण्याची विनंती करत आहे. मात्र या विनंतीला कोणी फारसे सिरियस घेतांना दिसत नाही. शहरात काल दि २४ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते एका खाजगी रुग्णालयाचे उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळात आयोजकांकडून आणि या सोहळ्यात हजर असलेले नागरिकांकडून  सोशल डिस्टन्सचा  फज्जा उडवत असल्याच्या पाहिला  मिळाला.

आयोजकांकडून आणि नागरिकांकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवण्याच्या दृश्य पाहता स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागरिकांना आणि आयोजकांना कानपिचक्या दिले.  शरद पवार म्हणाले की जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या पाहिली तर परिस्थिती किती गंभीर होती हे दिसून येते आता सगळेजण बाहेर पडतात मात्र काळजी तुम्ही घेत नाही आणि आम्हीही घेत नाही .

नाना पटोलें यांच्या या मागणीमुळे काँग्रेस हायकमांड नाराज ?

आमच्या गाईडलाईन नुसार एवढ्या गर्दीत जाण्याची परवानगीच आम्हाला नाही.दोघच की जोडी येथे दिसत नाही सगळे खांद्याला खांदा लावून आहेत बहुतांशी लोकांनी मास्क लावलेला नाहीत. या कार्यक्रमात पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की मागील काळात संपूर्ण जगात कोरोनाचे संकट होते आजही इंग्लंड युरोपीय देशातील संकट पुन्हा आले आहे.  इंग्लंडमध्ये पूर्ण लॉकडाऊन घेतले जात आहे आपल्याकडे थोडी परिस्थिती सुधारली सुविधा मिळाली की आपण आपल्या कामाला लागतो . मात्र काळजी घ्यायलाच हवी भारतीयांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने युरोप अमेरिका सारखी परिस्थिती आपल्याकडे नाही मात्र यावर समाधान मानत राहिलो तर भविष्यात पुन्हा कोरोनाच्या संकटाला तोंड द्यायची वेळ येईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

Related Posts
1 of 1,291

 नागपुरचे निकरवाले तमिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही – राहुल गांधी

याच कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा हजेरी लावली होती. हसन मुश्रीफ यांनी सुद्धा याच मुद्द्यावरून आयोजकांचे आणि नागरिकांचे कान टोचलेले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की कोरोनाचे संकट आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गर्दी टाळावी मास्कचा वापर करावा तसेच हॉस्पिटलला आरोग्य योजना मंजूर करू मात्र त्या रुग्णावर मोफत उपचार करा त्यांच्याकडून पैसे घेऊ नका अशा टोलाही जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी लावला.

 धनंजय मुंडे प्रकरणाचा विषय मागे पडला आहे.. – पंकजा मुंडे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: