दोन वेळा नकार मिळूनही कसे झाले सैफ- करीनाचे लग्न , जाणून घ्या …

बॉलिवूडमध्ये करिना कपुर हे नाव अत्यंत फेमस आहे. करिना प्रत्येक लहान मोठा निर्णय अगदी स्वतःच्या मनाचं ऐकून घेते .मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की करिनाने आपल्यापेक्षा वयाने १० वर्षांनी मोठ्या असलेल्या आणि घटस्फोटित सैफ सोबत लग्न का केलं . पण करिनाने सहजासहजी या नात्याला होकार दिला नव्हता.
सैफ- अमृता यांचा लग्नात करिना केवळ ११ वर्षांची होती . त्या दोघांच्या लग्नात करिना जेव्हा पाहुनी म्हणून गेली तेव्हा तिने दोघांना शुभेच्या दिल्या होत्या . आभार मनात सैफ ने थँक्यू बच्चा अशी प्रतिक्रिया दिली होती.सैफ अमृता च्या घटस्फोटानंतर करिना सैफ च्या आयुष्यात आली. एका शूटिंगच्या दरम्यान दोघांचे प्रेम जुळले.
२००८ मध्ये सैफ ने करिना ला प्रपोज केले पण करिनाने त्याला दोन वेळा नकार दिला. काही वेळ सोबत घालवल्यानंतर करिना ने लग्नासाठी सैफ ला होकार दिला आणि २०१२ मध्ये दोघांनी लग्न केले.आज करिना सैफ ला होकार देऊन खूप आनंदात आहे आणि ती या निर्णयाला आपला सर्वउत्कृष्ट निर्णय समजते.
सारा अली खान सैफ अली खानची मुलगी आहे . आपल्या वडिलांच्या लग्नात सारा खूप खुश होती आणि आपण सर्वोत्तम दिसावी याची ची स्वतः काळजी घेत होती.