दोन वाळूतस्करांविरोधात जामखेड पोलिसाने केला गुन्हा दाखल

0 39

जामखेड – वाळूतस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी जामखेड पोलिस आक्रमक झाले असुन पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. जामखेड पोलिसांच्या पथकाने जामखेड – खर्डा रोडवरील शिऊरफाट्या नजिक अवैध्यरित्या वाळूची वाहतुक करणा-या हायवा ट्रकवर पहाटे धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी दोघा वाळूतस्करांविरोधात गुन्हे दाखल करत सुमारे दहा लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चार ऑक्टोबर रोजी रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेदरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे हे आपल्या पथकासह जामखेड – खर्डा रोडवर गस्तीवर होते. या भागातील शिऊरफाटा नजीक असलेल्या हाॅटेल शिवशाही समीर एक हायवा ट्रक पथकाला दिसला. पथकाने सदर ट्रक थांबवून पाहणी केली त्यात पथकाला वाळू आढळून आली. यावेळी चालकाने पथकाला चौकशी दरम्यान उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांनी पंचांना बोलावून घेत गाडीचा पंचनामा केला असता त्यात पाच ब्रास वाळू आढळून आली.

Related Posts
1 of 1,359

पोलिस काँस्टेबल बाजीराव सानप यांच्या फिर्यादीवरून गाडीचालक सतिष वसंत साबळे याने गाडीमालक अकाश ऊर्फ मामा पिंपळे याच्या सांगण्यावरून हायवा गाडी नंबर एमएच १६ सीसी २२२ मधून वाळूची अवैध्यरित्या चोरटी वाहतुक केल्याप्रकरणी कलम ३७९ ,३४ आणि पर्यावरण संरक्षण कायद्यान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी २५ हजार रूपये किमतीची ५ ब्रास वाळू आणि दहा लाख रूपये किमतीची हायवा ट्रक जप्त केली आहे. पुढील तपास पोलिस नाईक अजय साठे हे करत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: