देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदुस्तान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्यक आहे – संभाजी भिडे

0 27
सांगली –    या देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदुस्तान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्यक आहे. असे स्पष्ट मत शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी  सांगलीच्या स्टेशन चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने बोलताना मांडले आहे.
 यावेळी बोलतांना संभाजी भिडे म्हणाले कि बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती, संपूर्ण देशात शिवसेना वाढवावी अशी आकांक्षा त्यांची होती. त्यांची ही इच्छा आकांक्षा पुर्ण करण्याचे काम हयात असलेल्या लोकांनी करणे गरजेचं आहे, असं संभाजी भिडे म्हणाले. तसंच नामकरण होईल पण कामाचे काय आहे. या सांगली शहरात २०० ते २५० शिवसेनेच्या शाखा का नाहीत. याचे तीव्र दु:ख आहे.

                        त्या रुग्णालयांचे रजिस्ट्रेशन रद्द का करू नये? – जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले

याचा विचार करून आपण सर्वांनी काम केले पाहिजे. हेच खरे नामाकरण ठरणार आहे. हा प्रवाह अखंड चालू राहिला पाहिजे’ अशी इच्छा भिडे यांनी बोलून दाखवली. या देशाला शिवसेना अत्यंत गरजेची आहे. ज्या प्रकारे अन्न, पाणी आणि निवार मनुष्याला गरजेचा आहे, त्यामुळे या देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदुस्तान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन कामावर आपण तुटून पडले पाहिजे, काम वाढवूया, लोकांमध्ये जाऊया, हे माझं वैयक्तिगत मत नाहीतर राष्ट्रीय मत आहे, असंही संभाजी भिडे यांनी यावेळी सांगितले.

 

Related Posts
1 of 1,292

  नागपुरचे निकरवाले तमिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही – राहुल गांधी

पुढे बोलताना ते म्हणाले कि हा संपूर्ण देश हिंदुत्वाच्या धारेखाली आणायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या फोटो नोटांवर छापण्याचे ताकद असलेला देश आपल्याला घडवायचा आहे. हे लक्षात ठेवून काम आपल्याला करायचे आहे. हे काम शिवसेनेच्या कार्यातच होणे शक्य आहे, हे माझे ठाम मत आहे  असंही भिडे गुरुजी म्हणाले.

                               आखेर आरोग्य विभागाने प्रसिद्ध केली मेगाभरतीची जाहिरात….

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: